जागतिक हृदय दिन विशेष
हृदयविकार : प्रतिबंधात्मक उपाय

-By  डॉ. पंकज हरकुट
इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट स्वास्थ्यम हॉस्पिटल, नागपूर

जगभरात जागतिक हृदय दिन साजरा होत असताना भारतात वाढत्या हृदय रोगाचे प्रमाण हे निश्चितच धोक्याची सुचना आहे. जर योग्य काळजी घेतली तर आपण हृदयरोगास निश्चितच टाळू शकतो. मात्र, त्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात हृदयविकाराचे प्रमाण आणि त्यास कसे टाळावे, यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
भारतात हृदयविकाराचे प्रमाण बघितले तर प्रत्येक ३३ सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु पावतो. शिवाय मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत व प्रत्येक मधूमेह रुग्णास हृदयविकार असल्याचे गृहित धरतोच. एकूणच जगभरातील सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण भारतात आहेत. आणखी एक बाब म्हणजे भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखिम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दुसरं म्हणजे वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदुषण देखील हृदयविकाराला पुरक ठरत आहेत. दहा वर्षापूर्वी चाळीशीच्या खालील एखाद दुसर्‍या रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने इस्पितळात भरती व्हायचा. आता मात्र, शंभरातील ३० रुग्ण हे हमखास चाळीशीच्या खालील असतात.
आता आपण बघितलं की, आपल्याला ह्रदयरोगाची अधिक जोखिम आहे. आपण हृदयरोग टाळण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. पण हृदयरोगाला टाळू शकणार नाही असे दोन घटक असतात, ते म्हणजे वय व अनुवांशिकता. या जोखिमा टाळता येणे शक्य नाही. पण जसंजसे वय वाढते किंवा अनुवांशिकदृष्टीने हृदयविकाराची संभावणा असल्याचे लक्षात आले, तर टाळता येण्यायोग्य घटकांवर कार्य केले पाहिजे. टाळण्यायोग्य घटकांमध्ये रक्तदाब व मधूमेह, धुम्रपान व बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा व उच्च कोलेस्ट्रॉलची मात्रा या बाबींचा समावेश होतो. योग्य दिनचर्या व आहाराने या जोखिमा निश्चितच टाळता येतात. विशेष म्हणजे वय वाढत असताना, या जोखिमांना टाळण्यासाठी कार्य केले पाहिजे.

मधूमेह व उच्चरक्तदाब :

हृदयविकारासाठीची पहिली व सर्वात मोठी जोखिम म्हणजे मधूमेह. त्याच्यासोबत उच्चरक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता या बाबी पर्यायाने येतातच. सोबत रक्तदाब हे केवळ हृदयच नव्हे तर मुत्रपिंड, मेंदू यावर प्रभाव पाडत पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही अडथळा निर्माण करतो. हे सगळे जीवनशैलीशी निगडीत विकार आहेत. आहार व व्यायामामुळे या बाबींना टाळता येऊ शकते.

व्यायामाचा अभाव :

आपण जशी आर्थिक गुंतवणूक करतो तर काही वर्षांनी परतावा मिळतो. अगदी त्याच प्रकारे जेव्हा रोज व्यायामाची गुंतवणूक करू तर जीवनात परतावा मिळेल. पण व्यायामाच्या अभावी हृदयरोगाची जोखिम वाढत आहे. मात्र, रोज पंधरा मिनिटे व्यायाम केला तरी हृदयविकाराची जोखिम १४ टक्क्यांम्नी कमी होते.

बैठी जीवनशैली :

असे म्हटल्या जाते की, बसणे हे नव्या पिढीचे धुम्रपानच होय. जर आपण सलग खुप वेळ बसून कार्य करीत असू तर आपल्याला एका धुम्रपान करणार्‍या व्यक्तीएवढाच हृदयरोगाचा धोका असतो. आज तर सलग बसून काम करणे हे आपल्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. त्यामुळे आता खुर्च्यांवर ‘सिटिंग इज इंज्युरियस टू हेल्थ’ असे लिहिणे आवश्यक झाले आहे.

व्यायाम आणि हृदयरोग

व्यायामासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कमीत कमी किती व्यायाम करावा, असा प्रश्न नेहमीच हृदयरोग तज्ज्ञांना विचारल्या जातो. आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी ३० मिनिटं मध्यम तीव्रतेचा (मॉडरेट इंटेंसिटी) व्यायाम करणे अपेक्षित आहे. म्हणजे असा व्यायाम की, जो करताना व्यक्ती आपल्या भवतालच्या व्यक्तीसोबत बोलू शकतो, त्यास दम लागत नाही. रोज चालणे वा जॉगिंग या व्यायाम प्रकारात मोडते. किंवा आठवड्यातून तीन दिवस २५ मिनिटं थोडा तीव्र व्यायाम करणे अपेक्षित आहे. हा व्यायाम करताना दम लागतो व आपल्या बाजूला असलेल्या व्यक्तीशी बोलणे शक्य नसते. धावणे व जलतरण या व्यायाम प्रकारात मोडतो. शिवाय दोन दिवस वजन उचलून स्वतःच्या क्षमता वाढविण्याचा व्यायामा ज्यास वेट ट्रेनिंग म्हणतात, तो देखील करणे आवश्यक आहे. मात्र, व्यायामाचा अतिरेक व्हायला नको.

आहार…!

आहार, जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हृदयरोगात त्याचे महत्त्व तर अनन्यसाधारणच आहे. पण हृदयरोगाचे निदान झाले किंवा हृदयरोग टाळावयाचा असेल तरी आपल्याकडे आहार अचानक बचलविणे शक्य नसते. कारण तो संस्कृती, परिसर, सभौतालच्या वातावरण व लोकांवर अवलंबून असतो. मात्र, व्यायामाशी निगडीत काही ठोकताळे अथवा सर्वसाधारण नियम पाळले तरी आहारावर नियंत्रण आणता येईल. त्यापैकी पहिली बाब म्हणजे साखर किंवा साखरजन्य पदार्थांचे सेवन कमी किंबहुना वर्ज्य करणे. हल्ली तर रोजच्या जेवणानंतर डेजर्ट म्हणून गोड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे अयोग्य असून लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टंस, मधूमेह आणि पर्यायाने हृदयविकारास आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे सारख हा नव्या युगाचा तंबाखूच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दुसरं म्हणजे जे काही प्रिजर्व्ह अथवा डबाबंद आहे, ते हृदयासाठी घातकच आहे. त्या बाबी डबाबंद असल्यामुळे ताजे तर मुळीच नसतील. शिवाय टिकवून ठेवण्यासाठी रसायनांचा वापर देखील केल्या गेला असेल. हे रसायनं हृदयासाठी घातक ठरू शकतात. शेवटी आहाराच्या बाबतीत आणखी एक सुत्र लक्षात ठेवायचं की, जो आहार माझ्या आजीला माहित नाही, तो पदार्थ आरोग्यास योग्य नाही. अर्थात मार्केटिंगच्या काळात आजीला माहित असलेले पदार्थ डबाबंद करून विकल्या जात आहेत. मात्र, येथेही डबाबंद पदार्थ टाळले पाहिजेत.